फुले -आंबेडकर जयंती घरी राहूनच साजरी करा* *-सुरेशदादा गायकवाड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 April 2020

फुले -आंबेडकर जयंती घरी राहूनच साजरी करा* *-सुरेशदादा गायकवाड

फुले -आंबेडकर जयंती घरी राहूनच साजरी
करा
-सुरेशदादा गायकवाड




 नांदेड  :  क्रांतीवीर ज्योतिराव फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती घरी राहूननच साजरी करा, असे आवाहन तमाम  फुले - आंबेडकरी अनुयायांना प्रजासत्ताक पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी केले आहे.
    १० एप्रिल च्या रात्री घराच्या समोर क्रांतीवीर ज्योतिराव फुले यांच्या फोटो समोर तेलाचा दिवा अथवा मेनबत्ती लावावी. पुष्पहार आणण्या करीता मार्केट मध्ये फिरू नये, सकाळी ज्योतिराव यांच्या पुतळ्याच्या जवळ जमाव करू नये.घरीच फोटोस कुटूंबीयासह अभिवादन करावे. १३ एप्रिल रोजी रात्री घरासमोर घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे च्या पुढे दिवा किंवा मेनबती लावावी.पुष्पहार अर्पण किंवा आतिशबाजी करण्यासाठी बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर जमाव जमा करू नये. १४ एप्रिल रोजी सकाळी सार्वजनिक ध्वजारोहन चार ते पाच जणाच्या समुहाने करावे,तेथेही जमाव जमवू नये.जयंती दिनी आपल्या घरी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुटूंबीयांसह अभिवादन करावे,पुष्पहारा साठी मार्केट मध्ये  फिरू नये.१४एप्रिल या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन समोरील पुतळ्यास हार अर्पण करण्याचा हट्ट करू नये,दिवसाची मिरवणुक पण काढण्याचा हट्ट करू नये. या संदर्भात महसुल आणि पोलीस प्रशासन ज्या सूचना देईल त्यां सुचनांचे पालन करावे.
    देशातील मानव समाजाचे जिवीत धोक्यात असताना आपण ही देश आणि मानव जिवीताचे हीतास सर्वोच्च प्राधान्य देऊन क्रांतीवीर ज्योतिराव फुले आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळा शांतता आणि बंधुभाव वृध्दी साठी साजरा करावा, अशी विनंतीही  प्रजासत्ताक पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages