गुटखा विक्रीच्या वाहतुकीवर कारवाई ; माहूरला 42 हजार रुपयांचा गुटखा जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 April 2020

गुटखा विक्रीच्या वाहतुकीवर कारवाई ; माहूरला 42 हजार रुपयांचा गुटखा जप्त

गुटखा विक्रीच्या वाहतुकीवर कारवाई ; माहूरला 42 हजार रुपयांचा गुटखा जप्त


  नांदेड : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे जावेद बरकत खिच्ची हा मोटार सायकल क्र एचएच 26 बीबी-0506 वरुन 42 हजार रुपयाचा गुटखा व पानमसाला या प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करतांना नुकतेच आढळून आला. त्यामुळे संबंधित आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सिंदखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटार सायकलही जप्त करण्यात आली आहे.

या वाहनाचा परवाना रद्द करण्यासाठी नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कळविण्यात आले असून  ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सं. वि. कनकावाड यांनी केली आहे.

कोणीही प्रतिबंधीत अन्न पदार्थाचे उत्पादन, वाहतूक, साठा, वितरण, विक्री करु नये.  शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडच अन्न सुरक्षा अधिकारी सं. वि. कनकावाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages