अन्नधान्यापासून वंचित कुटुंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्य वाटप करण्याची आ. केराम यांची मागणी. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 24 April 2020

अन्नधान्यापासून वंचित कुटुंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्य वाटप करण्याची आ. केराम यांची मागणी.

किनवट. :
 शिधापत्रीका नसलेल्या अन्नधान्यापासुन वंचित गरीब व गरजू कुटुंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्य वाटप करण्याची मागणी आ. केराम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
  कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन, संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने हातावर पोट असणा-या कष्टकरी मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान शासनाने प्राधान्य कुटुंब व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना कुटुंबातील प्रतीव्यक्ती ५ किलो तांदळाचे मोफत वाटप सुरू केले असले तरी शिधापत्रिका नसलेल्या गरीब मजूर कुंटुंबियांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे. करिता शासन प्रतिनिधी व अन्न पुरवठामंत्री या नात्याने सामाजिक बांधिलकी स्विकारून ग्रामीण भागातील तलाठी व ग्रामसेवक तसेच शहरी भागातील नगर परिषदेकडून सर्वेक्षण करून ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत अशा गरीब कुटुंबियांचे आधार कार्ड ग्राह्य धरून सरसकट कामगारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचे राज्यातील जिल्हाधिका-यांना आदेशीत करावे अशी लेखी मागणी केराम यांनी केली आहे.
 तथापि कामगारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याची जबाबदारी तहसील पातळीवरून सुरू करून एकही गरीब कुटुंब अन्नधान्यापासुन वंचित राहू नये यासाठी ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत तसेच ऑनलाईन केसरी (एपीएल) शिधापत्रिका धारकांना अद्यापही अन्नधान्याचे वाटप झाले नाही अशा वंचित गरीब कुटंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्याचे वाटप करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना द्यावेत अशी लेखी मागणी आ. केराम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांचेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages