नांदेड, दि. 23 : शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शुद्धीपत्रक 24 एप्रिल मध्ये अंशत: बदल करुन केवळ अशा शेतीविषयक आस्थापना, दुकाने, कृषि उत्पन्न बाजर समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा व वाहतूक ज्यांना यापुर्वीच्या आदेशान्वये चालू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यांना आता सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा वेळोवेळी निर्गमीत आदेशात नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि. 13, 15, 19, 21 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे शेती विषयक आस्थापना, दुकाने वगळून इतरांसाठी दिलेले वेळेचे बंधन इत्यादी यापुर्वी प्रमाणेच अंमलात राहील, असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 23 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे.
Thursday 23 April 2020
शेतीविषयक आस्थापना चालू ठेवण्यास सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत वेळेची मुभा
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment