नांदेड, दि. 24 : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर कन्टेनमेंट झोन मधील एकुण 3 हजार 79 घरांमधील 13 हजार 309 व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उपआयुक्त (आरोग्य) अजिपाल सिंघ संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. बदीयोद्दीन, डॉ. बळीराम भुरके, डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ. कल्याण पवार, आरोग्य पर्यवेक्षक, 40 आशा वर्कर आणि 40 परिचारिका यांनी कन्टेनमेंट झोनमध्ये नागरिकांची तपासणी केली.
पिरबुऱ्हाणनगर येथील एका 64 वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर इ. परिसर हा कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना बाधीत व्यक्तीच्या परिवारातील 8 सदस्यांना आरएनआय निवास येथे आज दाखल करण्यात आले.
Thursday 23 April 2020
मनपा क्षेत्रातील कन्टेनमेंट झोनमधील 13 हजार 309 व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे तपासणी
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment