महाराष्ट्रात ४९० करोनाबाधित,२६रुगणांचा मृत्यू
मुंबई: राज्यात शुक्रवारी ६७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ४३ रूग्ण एकट्या मुंबईतील आणि १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० वर गेली असून आतापर्यंत २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुक्रवारी आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये पुण्यातील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे शुक्रवारी राज्यात ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि २ जण मुंबई येथील आहेत. मृतांपैकी बदलापूर, पुणे आणि मुंबईतील तीन रूग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केलेला नव्हता. तर जळगावमध्ये मृत झालेला रूग्ण कोरोनाबाधिताचा सहवासित होता.
Saturday, 4 April 2020

महाराष्ट्रात ४९० करोनाबाधित,२६रुगणांचा मृत्यू
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment