कोरोना वायरस वरील संशोधना करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिली जागा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

कोरोना वायरस वरील संशोधना करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिली जागा

कोरोना वायरस वरील संशोधना करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिली जागा
 औरंगाबाद : महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतात थैमान घालणाऱ्या कोरोना मुळे संपूर्ण भारताला लॉक करण्यात आले आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. असे असतांना कोरोना वरील संशोधना करिता महाराष्ट्रा शासना कडून येत्या एका हप्त्या मध्ये प्रयोग शाळा उभारली जाणार आहे. याकरिता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा कडून जागा देण्यात आली आहे. येथे ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हि माहिती दिली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील डीएनए आणि बायोडाय या विभागात ही प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. या प्रयोग शाळे करिता 1.59 करोड रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे, असे कुलगुरू कडून सांगण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Pages