महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ५३७;राज्याच्या चिंतेत वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ५३७;राज्याच्या चिंतेत वाढ

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ५३७;राज्याच्या चिंतेत वाढ


मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आज मुंबईत २८ आणि ठाणे जिहा व इतर महानगरपालिका क्षेत्रात १५ नवे रूग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग काहीसा वाढला आहे. मुंबईमध्ये २८, ठाणे जिल्हा व इतर महानगरपालिका क्षेत्रात १५, अमरावतीत १, पुण्यात २ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १ असे एकूण ४७ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या ५० रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर या विषाणुच्या संसर्गाने राज्यात आजपर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५३७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages