जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर
नांदेड : जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत (दि.३) एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात निजामुद्दीन मरकज बाबत प्राप्त यादीतून चौदापैकी आठ जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित सहा रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल उद्यापर्यंत येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
शासकीय रुग्णालयातुन एकूण 105 रुग्णांचे स्वब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्या पैकी 86 नमुण्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे, तर 14 नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे. 5 नमुन्यांच्या तपासणीची गरज नाही, असे राष्ट्रीय विषाणु संस्थने स्पष्ट केले आहे.
शासकीय रुग्णालयात नोंद झालेल्या 386 रुग्णांपैकी 146 रुग्णांचे विलीगीकरण करण्यात आले आहे.
निजामुद्दीन मरकज बाबत प्राप्त यादीतील 14 पैकी 8 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित रुग्णांच्या नमुण्यांचा अहवाल उद्या पर्यंत येईल.
Saturday, 4 April 2020

जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment