आपत्कालीन परिस्थितीत शिक्षकांना सुद्धा विमा संरक्षण लागू करावे -पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

आपत्कालीन परिस्थितीत शिक्षकांना सुद्धा विमा संरक्षण लागू करावे -पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

आपत्कालीन परिस्थितीत शिक्षकांना सुद्धा विमा संरक्षण लागू करावे
   पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी



 किनवट : कोरोना महामारीचा व्याप आटोक्यात आणण्यासाठी सेवा देणाऱ्या घटकात दिवसेंदिवस वाढ होत आहे .आता राज्यातील प्राथमिक शिक्षकांना यातील विविध कामे दिली जात आहे .तेव्हा सदर कामात असलेल्या शिक्षकांना सुद्धा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण लागू करावे,अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
     कोरोना उपाययोजना कार्यात सेवा देत असलेल्या डॉक्टर, नर्स व पोलीस कर्मचारी यांना ५० लाख तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना २५लाख रुपयांचे विमा संरक्षण शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. राज्यातील शासकीय व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक शिक्षकांना सुद्धा नव्याने पोलीस मित्र, रुग्ण सहायता कक्ष, रुग्ण सर्वेक्षण व मार्गदर्शन, स्थलांतरित सर्वेक्षन, कोरोन्टीन केंद्र देखभाल अशी ग्रामीण व शहरी पातळीवरील कामे देण्यात आली आहे, यात शिक्षकांचा सामना थेट कोरोना बाधित रुग्णांशी होण्याची दाट शक्यता आहे करिता त्यांना सुद्धा विमा संरक्षण गरजेचे आहे.
           राज्यातील शिक्षक नेहमी राष्ट्रीय आपत्तीच्या काळात शासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत असतात, प्रत्येक आपत्तीमध्ये आपले वेतन सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करतात, यावेळी अश्या संवेदनशील महामारीत जनतेत जाऊन कार्य करीत असल्यामुळे शिक्षकांना विमा संरक्षण गरजेचे आहे. करिता राज्यातील प्राथमिक शिक्षकांना ५०लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करावे. अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाच्या माध्यमातून संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी केली आहे.अशी माहिती राज्यसंघटक ग.नु.जाधव ,जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे व किनवट  तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर  यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages