सोशल डिस्टस्टिंग चे नियम पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व धाडस युवा प्रतिष्ठान तर्फे माजीआमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

सोशल डिस्टस्टिंग चे नियम पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व धाडस युवा प्रतिष्ठान तर्फे माजीआमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

सोशल डिस्टस्टिंग चे नियम पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व धाडस युवा प्रतिष्ठान तर्फे माजीआमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

 सारखनी : संपूर्ण जग व देश मानव जातीच्या अस्तित्वाचे युद्ध लढत असल्याने लॉकडाऊन पाळले जात आहे. या लॉकडाऊन मुळे मानवी साखळी विस्कळीत झाली आहे. या विस्कळित साखळीमुळे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक वस्तूंची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याच्या प्रामानिक उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा मंडळी च्या पुढाकारातुन शनिवारी (दि.४) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात १०९रक्त दात्यांनी रक्तदान केले.
  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रदीप नाईक, ठाकूर जाधव,  समाधान जाधव,  विशाल जाधव,  मल्हार शिवरकर  ,  रफिक शेख (नायब तहसीलदार), बंडू नाईक, बाबू सेठ, वणमाला तोडसाम (सरपंच) , प्रकाश गब्बा राठोड,  कुंदन पवार , अॅड. राहुल नाईक ,  विनोद राठोड, लक्षमन मिसेवार , रशीद फाजलानी,प्रवीण राठोड (नगरसेवक), गजाजन बोलचेट्टीवार, कचरू जोशी , बालाजी बामणे मलकवाडीकर, महेश कणकावाड(उपसरपंच), राजू सुरोशे व स्वराज ग्रुप, किनवट यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

   या शिबिराचे आयोजन अंकुश (चिंटू) जाधव ,आशिष केवलसिंग नाईक (राठोड), बंटी पाटील जोमदे, इकलास फाजलानी ,श्रीनिवास येईलवाड, देवेंद्र कोवे,समद फाजलानी, मुज्जु चाऊस, सय्यद अन्सार दर्शनसिंघ , सोनू पाटील यांनी केले होते.
   या रक्तदान शिबिरात अर्पण ब्लड बँकेने रक्त संकलित केले.  रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सारखनी चे उपसरपंच अंकुश जाधव व आशिष राठोड यांच्या चमूने कठोर परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages