यवतमाळमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसठी ३७ निवारागृहे सुरु - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 April 2020

यवतमाळमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसठी ३७ निवारागृहे सुरु

यवतमाळमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसठी ३७ निवारागृहे सुरु



 यवतमाळ  :  संचारबंदीमुळे कलम 144 ची कडक अंमलबजावणी होत आहे. नागरिक आहे तेथे अडकून पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे रहिवाशी इतर राज्यांमध्ये व इतर जिल्ह्यातसुद्धा थांबले आहेत. तर इतर राज्यातील व इतर जिल्ह्यातील रहिवाशी यवतमाळ जिल्ह्यात अडकून पडले आहेत. या अडकून पडलेल्या नागरिकांची संपूर्ण जबाबदारी पालक म्हणून यवतमाळ जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची तसेच बाहेर निघता येत नसल्यामुळे त्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अतिशय संवेदनशीलपणे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या नेतृत्वात प्रशासनाने उचलली आहे.

आजघडीला बाहेरच्या राज्यातील व इतर जिल्ह्यातील यवतमाळमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने 37 निवारागृहे सुरू केली आहेत. यात जवळपास 3 हजार नागरिकांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय प्रशासनाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages