मास्क नीट घातला तरच कोरोनापासून बचाव शक्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 April 2020

मास्क नीट घातला तरच कोरोनापासून बचाव शक्य


मास्क नीट घातला तरच कोरोनापासून बचाव शक्य




कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केवळ तोंडावर मास्क लावणेच पुरेसे आहे का? जर मास्क नीट घातला नाही तर कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. मास्कचा योग्य वापर कसा करावा, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला जर माहीत नसेल तर जाणून घ्या तोंडावर मास्क घालण्याची योग्य पद्धत…

ही खबरदारी घ्याः
– फक्त नाकाखालचा भागच झाकला जाईल, अशा पद्धतीने मास्क घालू नका.
– नाकाचा फक्त ऊंचीचा भागच झाकून राहील, अशाही पद्धतीने मास्क घालू नका.
– हनुवटी आणि ओठाच्या खालचा भागही मोकळा सोडू नका.
– मानेला मोकळे वाटावे म्हणून फक्त हनुवटीभोवतीच मास्क गुंडाळू नका.
– चेहरा आणि मास्कमध्ये अंतर राहील, एवढा सैल मास्क घालू नका.
– जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा मास्क वारंवार खाली-वर करू नका.
– जेव्हा मास्क घालून बाहेर पडाल तेव्हा हाताचा मास्कला स्पर्श होणार नाही,असा प्रयत्न करा.
काय करावे?
– मास्क अशा पद्धतीने घाला की नाक, हनुवटीसह पूर्ण चेहरा झाकला जाईल.
– मास्कचा वापर करण्यापूर्वी आणि केल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या.
– जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरील मास्क काढाल तेव्हा मास्कच्या समोरच्या भागाला -स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्या.
– कपड्याचा मास्क दररोज धुवून घ्या आणि तो सुकवून तो कोरड्या जागेवरच ठेवा.

हे लक्षात ठेवा की, पहिल्यांदाच मास्क घालण्याची वेळ असल्यामुळे तो योग्य पद्धतीने घालण्यात थोडीशी अडचण वाटू लागते. काही दिवसांच्या सरावानंतर तुम्ही मास्क अगदी योग्य पद्धतीने वापरायला लागाल. आपल्या सुरक्षिततेबाबत विनाकारण घाबरून जाऊ नका.

No comments:

Post a Comment

Pages