भीमजयंती घरीच साजरी करून कोरोनावर मात करा ;हेच खरे डॉ.बाबासाहेबांना अभिवादन- खासदार हेमंत पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 April 2020

भीमजयंती घरीच साजरी करून कोरोनावर मात करा ;हेच खरे डॉ.बाबासाहेबांना अभिवादन- खासदार हेमंत पाटील

भीमजयंती घरीच साजरी करून कोरोनावर मात करा ;हेच खरे डॉ.बाबासाहेबांना अभिवादन- खासदार हेमंत पाटील



 हिंगोली : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व बौद्ध अनुयायांनी घरीच साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे व कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करावी, असे भावनिक आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .
               सर्व दिन दलित समाजाचे उधारकर्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व  बौद्ध धर्मियांच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे .देशभर 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात हा जयंती सोहळा साजरा केला जातो.या निमित्ताने समाजातील प्रत्येक लहान थोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध विहारात , पुतळा परिसरात मिरवणुकीत सहभागी होत असतात , 18 तास अभ्यास उपक्रम, सामूहिक बुद्ध वंदना आयोजित केली जाते . पण  यंदा कोरोना विषाणूच्या हाहाकाराने संपूर्ण जग हादरून गेले असल्यामुळे  भीम जयंती सोहळा नागरिकांनी एकत्र येऊन साजरा करू नये तर आपल्या घरात राहूनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे भावनिक आणि नम्र आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी सर्व जनतेस केले आहे.  सध्या जमाव बंदी आदेश आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत सर्व समाजबांधवांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले. आपण घरात बसून महामानवांचे विचार आत्मसात करावे आणि कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारावर मात करावी हीच खरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना असेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.कोरोना विषाणू साथीच्या काळात खासदार हेमंत पाटील यांना संपूर्ण मतदार संघाचा दौरा केला मतदार संघातील आरोग्य केंद्र,क्वारनटाईन होम ,ला भेटी देऊन पाहणी केली तसेच पोलीस कर्मचारी, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या भेटी घेऊन ते करत असलेल्या कामाबद्दल ऋण व्यक्त केले. तसेच विविध सामाजिक संघटनांकडून दानशूर व्यक्तींकडून  गरीब आणि गरजू लोकांना वाटप करण्यात येणारे धान्य देशहिताच्या दृष्टीने आयोजित केलेले रक्तदान शिबिर या कार्यक्रमांचा गौरव केला.

No comments:

Post a Comment

Pages