कोरोना चाचणीसाठी पाठवलेले186 अहवाल प्राप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

कोरोना चाचणीसाठी पाठवलेले186 अहवाल प्राप्त

कोरोना चाचणीसाठी पाठवलेले 186 अहवाल प्राप्त


 नांदेड दि. 11 :- कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या 196 नमुन्या यापैकी 186  जणांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील पाच जणांचे नमुने नकार झाले आहेत आणि पाच नमुन्यांचा तपासणी अहवाल अजून अप्राप्त आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत 332 रुग्णांना  क्वारंनटाईन केले होते. यातील 113 लोकांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून 191 लोकांना आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages