बाबासाहेब समजून घेताना भाग 2 :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ.
डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे विविध विचारांच्या पैलूंवर प्रकाश टाकताना आज आपण पाहणार आहोत बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्ती व उन्नतीसाठी योगदान ...
समतेचा सर्वात मोठा पुरस्कर्ता , स्त्रीपुरुष समानतेचे प्रणेते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श आहेत. बुद्धाने आपल्या भिखु संघात स्त्रियांना समान स्थान देऊन ही सुरुवात केली तोच आदर्श बाबासाहेब यांच्या डोळ्यासमोर होता .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना जे अधिकार दिलेत त्यामुळंच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रियांच्या ज्या ज्या चालवली उभ्या राहिल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी जे प्राविण्य मिळविले आणि समाजजीवनाच्या मध्यास्त्रोतात येण्याची जी धडपड सुरु केली त्या सगळ्यांचं अधिष्ठान राज्यघटना होय. म्हणजेच पर्यायाने डॉ. आंबेडकर होय. समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत जगातील अनेक देशात यासाठी काही लिखित कायदे पारित
करण्यात आले. काही विशेष स्वरूपाच्या तरतुदी करण्यात आल्या. कुठे विशेष सवलती देण्यात आल्या. भारतामध्ये या लढ्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन करून केली. मनुस्मृतीचे दहन करण्यामागे एक महत्वाचे कारण मनुस्मृतीने भारतीय महिलांना मूलभूत मानवी हक्कांपासून पूर्णतः वंचित केले आहे हे होते, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून भारतामध्ये लिंगाधारित भेदभावाच्या विरुद्ध पहिला आवाज उठविला. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या विषमतावादी मनुच्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी दहन घडवून आणले. शूद्र जातीचे आत्मबल नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय, आर्थिक गुलामगिरी कायम करणारा ” मनुस्मृती ” हा ग्रंथ माणुसकीचा उच्छाद करणं आहे, असा ठराव पारीत करून त्यांनी मनुस्मृतीचे दहन श्री. चित्रे आणि श्री. सहस्त्रबुद्धे या स्पृश्य सहकाऱ्यांच्या मदतीने केले. या ठरावाला पाठिंबा -अनुमोदन देणारी दलितभागिनी होती श्रीमती गंगुबाई सावंत.
दर. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य या देशातील शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या चळवळीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार भारतीय विषमाताप्रेरित समाजव्यवस्थेची पुनर्रचना करणे आहेत. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी मांडलेले विचार आणि हिंदू कोडबिळातील त्यांनी सुचविलेल्या तरतुदी यातून त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांच्या नवजीवन बाकांधानीचा पहिला प्रयोग सुरु केला हि गोष्ट खर्च आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्याच प्रमाणे स्त्रियांचे प्रश्न सामाजिक पुनर्र्चनेसाठी आवश्यक समजून उचलून धरलं. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी जमलेल्या स्त्रीवर्गाला उद्देशून ते म्हणाले होते, ” स्त्रियांनी मुलांना शिक्षण देण्याचा आग्रह धरावा. dhnyan आणि विद्या हि काही पुरुषांची मक्तेदारी नाही. ते स्त्रियांनाही आवश्यक आहे. गरीब स्त्रियांनी नीटनेटके आणि स्वच्छ राहावे, असे त्यांचे आग्रही सांगणे असायचे. तुमच्या गुलामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या दागिन्याला ( कथलाचे, नकली दागिने) फेकून द्या. स्त्रियांनी निर्भयतेने जगण्यास शिकले पाहिजे. मुलींना आपला नवरा निवडण्याचा अधिकार आहे, असे ते तेव्हापासूनच सांगत.
1927 साली मुंबई विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर 1928 साली भारतीय महिला कामगारांसाठी maternity benefit bill पहिल्यांदा सभेसमोर चर्चेसाठी आणणारे आणि स्त्रीयांना बाळांतपण साठी हक्काची वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे म्हणून आग्रही असणारे बाबासाहेब हे पहिले सदस्य होत..त्यांच्या प्रयत्नामुळे maternity benefit act अस्तित्वात आला.
भारतातील जातीव्यस्थेच्या उतरंडीचा पाया आणि भारतीय स्त्रीवर पुरुषसत्ताक संस्थेचा आवळून बसवलेला छाप याचा संबंध डॉ.आंबेडकरांच्या लिखाणात व तत्वज्ञानात दिसून येतो. शुद्र व स्त्री हे दोन्ही शोषित घटक असून त्यांच स्वतंत्र जातीव्यवस्थाला परवडणारे नाही.स्त्रीवर बालविवाह, जराठविवाह, केशवपन,परितक्त्या, सती अश्या विविध मार्गाने समाज अन्याय करत असतो ते हटले पाहिजे असे बाबासाहेब म्हणायचे.
1942 ते 1946 मध्ये कामगार मंत्री असताना "Equal pay for equal work irrespective of sex" ही क्रांतिकारी संकल्पना बाबासाहेब यांनी राबवली.आर्टिकल 39(d) मध्ये ही तरतुद आहे ...
त्यांनी भारतीय घटनाप्रमुख म्हणून स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने जे अभूतपूर्व असे हिंदू कोड बिल सादर केले, ती भारतीय स्त्रीच्या हातापायांत जखडलेल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणारी महत्त्वपूर्ण घटना होती.
डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाविषयी स्पष्ट खुलासा करूनही विरोधकांनी जो गदारोळ करायचा तो केलाच. तरीसुद्धा डॉ. आंबेडकर यशस्वी होऊन सुट्या स्वरूपात बिल पास झालेच. स्त्री-धन, घटस्फोट, आदी दृष्टीने स्त्रियांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाले. त्या आधीच मतदान, शिक्षण, रोजगार यांची राज्यघटनेने हमी द्यावी, असे प्रयत्न करण्यात बाबासाहेब यशस्वी झालेलेच होते. अलीकडे बलात्कारविरोधी, हुंडाविरोधी, स्त्रीधनावर स्त्रीचा हक्क, सासरचा छळ, जळीत प्रकरण, घटस्फोट आदी संबंधित जे अनेक कायदे स्त्रीच्या फायद्याचे करण्यात आले आहेत, त्यांचे सूतोवाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या हिंदू कोड बिलातच झालेले होते.
त्यामुळे भारतीय स्त्रीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव प्रातःस्मरणीय झाले आहे. आपल्या स्वदेशी भगिनींवर केवढे हे अपरिमित उपकार त्यांनी करून ठेवले आहेत. प्रत्येक भारतीय स्त्री बाबासाहेबांची ऋणी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रियांविषयी आपुलकी होती, याचे कारण त्यांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांचा अनुभव हा अतिशय समृद्ध व सुखद असा होता. त्यांची आई भीमाई ही तर बाबासाहेबांच्या लहानपणीच वारली होती. पण त्यांच्या आत्याने त्यांचे संगोपन मोठ्या मायेने केले. नंतर त्यांची पत्नी सौ. रमा या साध्वीने हा महापुरुष जपला होता.
अशा पुरुषाला जपणारी, त्याला जीवनभर फक्त प्रेमच देणारी स्त्रीजात पिढ्यान्पिढ्या दयनीय अवस्थेत आहे, स्वतःच्या प्रश्नांबाबत अनभिज्ञ आहे, हे सर्व कविमनाच्या डॉ. बाबासाहेबांना कसे बरे सहन होणार? आपला एक ग्रंथ आपल्या इंग्लंडमधल्या "F' नावाच्या अभिभाविकेला समर्पित करताना ते म्हणाले होते, "In thy presence is pleasure of the joy!' केवढा हा हळुवार भाव. केवढा हा स्त्रीविषयी डॉ. बाबासाहेबांच्या मनाच्या ठिकाणी असणारा मोठेपणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री-शिक्षणावर विचार
डॉ. बाबासाहेबांनी महाड समता संग्रामाच्यावेळी दि. 27 डिसेंबर 1927 रोजी स्त्रियांना उद्देशून जे भाषण केले, त्यात स्त्रीशिक्षणाचे महत्त्व विशद करताना, "तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत. त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत,' असा उपदेश करताना आपल्या पूर्वजांनीही शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळेच त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. त्यांच्या आयुष्यातील 27 वर्षांपूर्वीच्या म्हणजे कोकणातील जागृत अस्पृश्य समाजाचे चित्रण रंगवून बाबासाहेबांनी आपल्या अस्पृश्य बांधवांच्या मनात एक नवा आशावाद तर निर्माण केलाच, पण त्याचबरोबर अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी अस्पृश्य स्त्रियांची प्रगती होणे आवश्यक आहे. त्या प्रगतीसाठी शिक्षण कसे महत्त्वाचे आहे, म्हणून स्त्री-शिक्षणाकडे पाठ करून चालणार नाही, हा महत्त्वाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भगिनींसमोर मांडावयाचा होता.
समाजातील जे वर्ग किंवा जे लोक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण करतात, त्यांना त्यांच्या या कामात पुढच्या शैक्षणिक जागृतीमुळे यश येत नाही. कारण अज्ञानमूलक भोळ्या समजुती शिक्षणामुळे नष्ट होतात, मनुष्य निर्भय होतो, जागृत होतो, हे ओळखून डॉ. बाबासाहेबांनी शिक्षण हे माणसाची गुलामी नष्ट करण्याचे व त्याच्यात स्वत्वाची ओळख करून देण्याचे व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले आहे. याचा अर्थ स्त्रियांमध्येही उच्च शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय, त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण होऊन, त्या निर्भय होऊन त्यांचा जगण्यातील आत्मविश्वास वाढणार नाही आणि आत्मविश्वासाशिवाय त्यांची उन्नती होणार नाही, कारण आत्मविश्वास हा प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीची पहिली पायरी आहे. तेव्हा स्त्रियांमध्ये विशेषतः अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या उपेक्षित व असहाय्य स्त्रियांत आत्मविश्वास निर्माण झाल्याखेरीज त्यांची स्वत:ची, समाजाची व देशाची उन्नती होणार नाही. अशा प्रकारे आत्मविश्वास निर्माण करण्याचे "शिक्षण' हे एक माध्यम आहे. जर स्त्रीवर्गात जागृती झाली तर त्या अस्पृश्य समाजाची फार मोठी प्रगती घडवून आणू शकतात, याची त्यांना जाणीव होती. महिलांच्या संघटित शक्तीवर, संस्थांवर त्यांचा विश्वास होता.
संघटित होण्यासाठी, संघटित होऊन समाजातले दुर्गुण नष्ट करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, ही बाबासाहेबांची स्त्री-शिक्षणविषयक भूमिका होती. या भूमिकेतूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना "तुम्ही सर्वप्रथम शिक्षित व्हा, स्वच्छता पाळा, आपल्या मुला-मुलींना शिकवा, त्यामुळे देशाचा विकास होईल, तुमच्या अस्मितेचाही विकास होईल. तुम्ही पण माणूस आहात, अशी तुम्हाला ओळख होईल, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,'
असे शिक्षणाचे महत्त्व डॉ. बाबासाहेबांनी स्त्रीवर्गासाठी विशद केले .
अश्या अनेक कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीमुक्ती व उन्नतीसाठी केलं आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीमुक्तीचे प्रणेते आहेत असेच सिद्ध होते ..
संकलन
युवा प्रबोधनकार अतुलराज बेळीकर
मु.पो.बेरळी(बु) ता.मुखेड. जि. नांदेड
8275663262 , 7030585129 ..
Thursday 9 April 2020
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ.
Tags
# प्रासंगिक लेख
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment