कृषि उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती बालाजी आलेवार यांच्या तर्फे शिवणी परिसरात घरोघरी१० हजार मास्क चे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 April 2020

कृषि उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती बालाजी आलेवार यांच्या तर्फे शिवणी परिसरात घरोघरी१० हजार मास्क चे वाटप

कृषि उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती बालाजी आलेवार  यांच्या  तर्फे  शिवणी परिसरात घरोघरी१० हजार मास्क चे वाटप
 शिवणी : तालुक्यातील शिवणी व परिसरातील गाव- वाड्या तांड्यातील नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून कृ.ऊ. बा.समिती ईस्लापूर चे उप सभापती  बालाजी किशनराव आल्लेवार यांच्या वतीने नुकतेच मास्क वाटप करण्यात आले.
    शिवणी गाव व परिसरातील अप्पारावपेट, मलकजाम,मलकजाम तांडा, दयाल धानोरा, द.धा.तांडा, गोंडजेवली,कंचली,पंगरपहाड, आंदबोरी, गोंडेमहागाव, मारलागुंडा, दुर्गानगर,दत्तनगर, शिवणगाव, तल्हारी, झळकवाडी, व परिसरातील ईतर गाव तांडे वाड्यात स्वतः बालाजी आलेवार व त्यांचे मित्र मंडळासह घरोघरी मास्क वाटप करण्यात आले.
   


शिवणीत घरोघरी मास्क वाटप करण्यात आले व मास्क वाटप करताना जनतेने अत्यावश्यक कामा वतीरिक्त घराबाहेर पडु नये व घरात राहून कोरोना ला हद्दपार करू व तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत जनतेला त्यांनी विनंती केली. घाबरू नका स्वतःची काळजी घ्या, असे आवाहनही करण्यात आले.संपूर्ण परीसरात  घरोघरी मास्क पोहचावे या साठी दहा हजार मास्क शिवण्यात आले.
    यावेळी शिवनीतील घरोघरी  मास्क वाटप करताना आ.भीमराव केराम यांचे प्रतिनिधी म्हणून किनवट नगर परिषदेचे अध्यक्ष आनंद मच्छेवावर,पं.स.उप सभापती कपील करेवाड, भाजपा ता. अध्यक्ष संदीप केंद्रे, साहेबराव देशमुख, कमलबाई देशमुख, सरपंच पती दिगंबर बोदरवाड, वाळकी येथील पो. पा डुडूळे, पत्रकार भोजराज देशमुख,दत्ता बेहरे, गणेश माने, माजी सरपंच बालगंगाराम भुशिवाड, संग्राम बिरकुले,संतोष जाधव, नरेश कौड,सतीश चिद्रावार,सुनिल कन्न्नावार ,प्रकाश कारलेवाड , रुपेश जयस्वाल, किशन वानोळे,शुभम देशमुख,व बालाजी मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.विशेष म्हणजे मास्क वाटप करण्यासाठी आलेले सर्व जण सामाजिक अंतर ठेवून मास्क वाटप केले. वेळोवेळी संकट काळी धावून जाणारे बालाजी आलेवार हे मास्क वाटप अभियान हाती घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
   विशेष रंगाचे मास्क वाटप पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर, नर्स आशा वर्कर, महाराष्ट्र व तेलंगाणा सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांना व पत्रकारांना आणि विविध क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत काम करण्याराना मास्क वाटप

No comments:

Post a Comment

Pages