डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तअभिवादन म्हणून घेतले रक्तदान शिबीर
नांदेड : शक्तीनगर येथील यूवकांनी व नागरिकांनी कोरोना (कोविड-19) या वायरस च्या आजारी लोकांसाठी दि.७ एप्रिल रोजी बौध्द विहार, येथे रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबीरात कोरोना पासून सूरक्षीते संदर्भातील सर्व नियमां चे पालन करण्यात आले होते.तसेच रक्तदात्या कडून covid 19 विषयी जनजागृती म्हणून काय करायला हवं आणि काय करू नये या बाबत विशेष भर देण्यात आला होता. सर्व समाज बांधवां कडून मित्र परिवारा च्या वतीने सर्व शहरातील सर्व भीम जयंती मंडळाला असाच रक्तदान उपक्रम घेऊन शासनास सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरात रक्तदान आयोजकांचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करावा म्हणून लखन कारले यांनी मित्रा च्या आणि नागरिकांचा मदतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी जवळपास 98 च्या वर रक्तदात्यांने रक्तदान करून सहकार्य केले. यात महेश मँगात्रा,रवी गजभारे,राजु कारले रवी मोरे सुंदरसिंघ ठाकूर,सोनूसिंघ ठाकूर,वसंत कांबळे , शुभम शंकपाल,चंद्रमुनी गजभारे, राजू चौदन्त्ते,क्षितिज कुरवाडे, प्रदीप तारु, मोहन लोंढे,सूर्यकांत सोनंकांबळे,गणेश ठाकूर,सचिन कांबळे,विकी सूर्यवंशी व सर्व बहुजन मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरसेवक सुरेश हटकर,किशोर जोंधळे,सावंत काका,आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Thursday, 9 April 2020
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तअभिवादन म्हणून घेतले रक्तदान शिबीर
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment