लाॅकडाऊनच्या काळातही रेती तस्करी;वन विभागाच्या पथकाने पकडले दोन ट्रक्टर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

लाॅकडाऊनच्या काळातही रेती तस्करी;वन विभागाच्या पथकाने पकडले दोन ट्रक्टर

लाॅकडाऊनच्या काळातही रेती तस्करी;वन विभागाच्या पथकाने पकडले दोन ट्रक्टर


किनवट : कोरोना या विश्वस्तरीय महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असतांना देखिल पैनगंगा अभयारण्य खरबी(जि.यवतमाळ) वनपरिक्षेत्रातील एरंड बीट कक्ष क्र.६०७ मधिल राखीव  नदीपात्रातून रात्री अवैधरित्या रेतीचे प्रचंड उत्खनन करुन विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर्स खरबी, कोरटा व बोधडी वनविभागाच्या संयुक्त पथकाने पकडले. धरपकड दरम्यान दोघे आरोपी फरार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
  पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय अधिकारी तसेच सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास चालु असून अधिक तपासातून नदीपात्रातील जेवढे उत्खननाचे खड्डे असतील तेवढी भरपाई करून घेण्याची शक्यता प्रशासन वर्तुळातून ऐकायला मिळु लागली आहे.
         पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत पैनगंगा अभयारण्य खरबी वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या कार्यालयाच्या कार्यकक्षेतील गाडी वर्तूळ अंतर्गत एरंड बीट असून त्यातील कक्ष क्र.६०७ त्रा पात्रातून रेतीची चोरी चालु असल्याची खबर खरबी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी ओ.बी.पेंदोर यांना मिळाली. त्यांनी कोरटा परिक्षेत्राचे  वनपरिक्षेत्राधिकारी एस.एस.पांडे, नांदेड विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गतच्या बोधडी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांना पाचारण केले होते. या तीनही परिक्षेत्रातील अधिका-यांसह कर्मचा-यांच्या संयुक्त पथकाने १० एप्रिल २०२० रोजी रात्री सदर नदीपात्रात जाऊन यशस्वी कार्यवाही केली. या पथकाला पाहून रेती तस्करांनी पोबारा केला. एका ट्रॅक्टरवर किमान सहा तर दोन ट्रॅक्टरवर दहा ते बारा मजूर असावेत, त्यांच्यासह ट्रॅक्टरचालकांनीही अंधाराचा फायदा घेत पोबारा केला आहे.
        वन्यजीव अधिनियम १९७२ कलम २७, २९, ५०, ५१, भा.अ.नि.१९२७ चे कलम २६ (१), ए.डी.जी.४२(१), महाराष्ट्र वननियम २०१४ चे नियम ३१,८२ व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानित प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्ह्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्या अंतर्गत दोन ट्रॅक्टर्स जप्त केलीत. बोधडी येथिल मारोती तोटरे व लक्ष्मीकांत केंद्रे यांच्या विरुद्ध सदर गुन्ह्याच्या नोंदी असल्याची माहिती  वनपरिक्षेत्र अधिकारी पेंदोर यांनी दिली. पुढील अधिक तपासा दरम्यान पैनगंगापात्रात उत्खनन करुन केलेल्या खड्यांचेही मोजमाप करण्यात येणार असून ती नुकसान भरपाई करुन घेतली जाणार  आहे. ही कार्यवाही यशस्वी करण्यासाठीकिनवट पोलीस स्टेशनचे पोहेका गजानन चौधरी ,वनरक्षक एस.एस,देवडे, वनरक्षक ए.बी.घायवट, वनरक्षक एम.के.पठाण, वनरक्षक एन.डी.मागीरवाड, वनरक्षक आर.एल.यादव यांच्यासह बोधडी वनविभागाच्या कर्मचा-यांनी पार पाडली आहे.

No comments:

Post a Comment

Pages