विट वाहतूक करणाऱ्या ट्रक ने दिली धडक,दोघे जखमी ;ट्रक चालक फरार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

विट वाहतूक करणाऱ्या ट्रक ने दिली धडक,दोघे जखमी ;ट्रक चालक फरार

विट वाहतूक करणाऱ्या ट्रक ने दिली धडक,दोघे जखमी ;ट्रक चालक फरार
किनवट : सारखणीकडून किनवटकडे येणा-या विट सप्लायरच्या गाडीने लोणी येथिल  मोटारसायकल स्वारास टक्कर दिल्याने दोघे जखमी झाले. धडक देऊन चालकाने पळ काढला परंतु दिलीप पावडे यांच्या सांगण्यावरुन  घोटी फाट्यावरील सुजान नागरीकांनी गाडी पकडली. मात्र, चालक फरार झाला. शेतात लपून बसलेल्या गाडीवरील मजुरांना पकडून लोकांनी पोलीसांच्या स्वाधिन केल्याची घटना काल (ता.१०) सकाळी घडली.
        एम.विट सप्लायरची टाटा कंपनीची ए.पी.०१-व्ही.६९६१ या क्रमांकाची गाडी विट खाली करुन किनवटकडे येत असतांना लोणी घाटात लोणी येथिल शुभम देवराव तलांडे (वय २२) व अविनाश वामन आतराम (वय  १८) या मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक मारली. हे दोघेही रस्त्यावर पडल्यानंतर त्यांना मदत करण्याऐवजी गाडीचालकाने तेथून पळ काढला. परंतु, प्रत्यक्ष दर्शितांनी मात्र त्या गाडीचा पिच्छा केला. दिलीप पावडे यांनी घोटी फाट्यावरील लोकांना फोनवरुन माहिती दिल्याने लोकांनी रस्त्यावर लाकडे टाकून रस्ता रोखला. फाट्या जवळ आल्यास ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने शेताशेतातून पोबारा केला. त्या गाडीवरील मजुरांनी शेतात लपून बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांच्या सतर्कतेमुळे लोकांनी चार मजुरांना पकडून पोलीसांच्या हवाली केले.

No comments:

Post a Comment

Pages