लाॅकडाऊन आता ३० एप्रिल प्रर्यंत -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

लाॅकडाऊन आता ३० एप्रिल प्रर्यंत -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

लाॅकडाऊन आता ३० एप्रिल प्रर्यंत -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे





मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. १४ एप्रिलनंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना आणि शाळा, विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांचे काय होणार, या सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला १४ तारखेपर्यंत देणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची मागणी मोदींकडे केली होती. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर सोशल मिडीयावरील लाइव्ह प्रक्षेणाव्दारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आणि राज्यातील लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवल्याची घोषणा केली. लॉकडाऊनच्या या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी १४ एप्रिलपर्यंत आम्ही स्पष्ट करीत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages