आधारभूत किंमत मिळण्यासाठी कडधान्य खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी-आमदार केराम यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

आधारभूत किंमत मिळण्यासाठी कडधान्य खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी-आमदार केराम यांची मागणी

आधारभूत किंमत मिळण्यासाठी कडधान्य खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी-आमदार केराम यांची मागणी किनवट : शेतक-यांच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळावी यासाठी कडधान्य खरेदी केंद्रांना मुदतवाढ देवून, ते खरेदी केंद्र सुरू ठेवावीत,अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
          राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात आमदार केराम यांनी नमुद केले आहे की,  किनवट व माहूर तालुक्यात आधारभूत किंमतीच्या धर्तीवर आदिवासी विकास महामंडळा तर्फे कडधान्य खरेदी केंद्र सुरू असून चना व तुर खरेदी सुरू आहे. तथापि, किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील शेतक-यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, मक्का आदी पिकांची पेरणी भरमसाठ प्रमाणात केली होती. चालू वर्षात अंदाजे १०० टनापेक्षाही जास्त मक्क्याचे उत्पन्न असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, सद्यपरिस्थितीत 'कोरोना' विषाणूच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन असल्याने सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर बहुतांश शेतक-यांचा शेतमाल अद्यापही पोहोचू शकला नाही.
    त्यातच पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादीत मालास हमीभाव मिळण्यासाठी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांवर मक्का व मालदांडी ज्वारी खरेदी करण्यास मुदतवाढ देऊन खरेदी केंद्र सुरू ठेवावेत,असे आमदार केराम यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Pages