किनवट विधानसभा मतदारसंघाकडे पालक मंत्र्यांनी लक्ष द्यावे; वैजनाथ करपुडे पाटील यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 19 April 2020

किनवट विधानसभा मतदारसंघाकडे पालक मंत्र्यांनी लक्ष द्यावे; वैजनाथ करपुडे पाटील यांची मागणी

किनवट विधानसभा  मतदारसंघाकडे पालक मंत्र्यांनी लक्ष द्यावे; वैजनाथ करपुडे पाटील यांची मागणी



 किनवट :  संपुर्ण जगात व देशात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. यामुळे विविध स्तरावर प्रशासकीय यंत्रणा सतर्क करण्यात आलेल्या आहेत. परंतु, किनवट सारख्या अतिदुर्गम व आदिवासी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा ही बेवारस असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे किनवट भागाकडे कायम दुर्लक्ष करत असल्याने प्रशासकीय यंत्रणे मध्ये मरगळ आलेली आहे. त्यामुळे आता तरी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी किनवट माहूर विधानसभा क्षेत्राला भेट देऊन पालकत्व सिध्द करावे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील यांनी सांगितले आहे.
      किनवट व माहूर तालुके हे विदर्भ व तेलंगणा राज्याच्या सिमेलगत असल्याने कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव कोणत्याही क्षणी होऊ शकतो. कारण यवतमाळ व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे अनुक्रमे ८ व १३ असे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. यामुळे ग्रीन झोन मध्ये असलेल्या नांदेड जिल्हा हा कधीही ऑरेंज झोन मध्ये जाऊ शकतो. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सिमा ह्या बंद राहणे व लॉकडाऊनचे नियम काटेकोर पणे पाळण्याची गरज आहे. यामुळे पालकमंत्र्यांची भेट अत्यावश्यक आहे. हिंगोली चे खासदार हेमंत पाटील हे किनवट माहूर तालुक्याला दोन वेळा भेट देऊन गेले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सारख्या महत्वाच्या पदावरील अधिका-याने त्यांच्याशी केलेली वागणुक ही सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हे अधिकारी एवढे शेफारले असेल व लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे वागणुक देत असतील तर सर्वसामान्य नागरीकांचे हाल त्यांच्या दरबारी काय असेल याची कल्पना न केलेली बरी. परंतु, या अशा प्रशासनाला सरळ करण्याची जबाबदारी ही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन अशोकराव चव्हाण यांची आहे. त्यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्याप्रती जी भूमिका घेतली तिच भूमिका किनवट व माहूर तालुक्याप्रती घ्यावी, असे ही  वैजनाथ करपुडे पाटील यांनी सांगितले.
      आजच्या स्थितीत लॉकडाऊन आहे. परंतु, अवैध धंद्यांना उत आलेला आहे शहर व तालुक्यात गुटखा, अवैध दारु, रेती तस्करी, हातभट्टीची दारु, परराज्यातील व इतर ठीकाणातील वाहनांना चिरीमिरीचे व्यवहार करुन प्रवेश देण्यात येत आहे. या अशा परिस्थितीत शासनांचे प्रतिनिधी म्हणुन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची नैतिक जबाबदारी आहे कि, त्यांनी किनवट माहूर तालुक्याला भेट द्यावी व येथिल आरोग्य व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, पोलिस यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबीची माहिती घ्यावी, असे ही वैजनाथ करपुडे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Pages