मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी
सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश
नांदेड दि. 18 :- राज्यात कोवीड-19 या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार सोमवार 20 एप्रिल 2020 पासून मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून (लॉकडाऊन) सूट देण्यात आली आहे. मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे.
कोरोना अर्थात कोवीड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन 20 एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना 17 एप्रिल 2020 रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.
त्यानुसार, राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, कोवीड 19 च्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी 10 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहे.
Saturday 18 April 2020
Home
जिल्हा
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यलयात उपस्थित राहण्याचे निर्देश
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यलयात उपस्थित राहण्याचे निर्देश
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment