बेफुजूल फिरणारांना लगाम लावण्यास नगरपालिका प्रशासन सरसावले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 April 2020

बेफुजूल फिरणारांना लगाम लावण्यास नगरपालिका प्रशासन सरसावले

बेफुजूल फिरणारांना लगाम लावण्यास नगरपालिका प्रशासन सरसावले



किनवट :
कोरोनाच्या प्रभाव वाढत असतांना सुध्दा जनता गांभिर्याने न घेता भाजीपाल्याच्या निमित्तानं रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. अशा बेफुजूल फिरणारांना लगाम लावण्यास नगरपालिका प्रशासन सरसावले असून मार्केट फिरून फळ, आलू - कांदे,भाजीपाला विक्रेते  व आडते यांना सायंकाळी सहा वाजता पूर्णपणे बंद ठेवण्यास फर्मावले आहे.
         कोरोना प्रतिबंधासाठी देशभर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या आदेशान्वये सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व तहसिलदार नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सोशियल डिस्टंसिंग पाळून अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. पाच भाजीपाला, दोन आलू कांदे व इतर ओळखपत्र दिलेले फ्रूट विक्रेते एवढयाच दुकानांना मार्केटमध्ये उघडण्यास परवानगी दिली आहे. गाड्यावर हॉकर्स प्रत्येक वार्डा- वार्डात घरपोच भाजीपाला पोहचवत आहेत.
         परंतु खरेदीच्या निमित्तानं बहुसंख्य लोकं रस्त्यावर, मार्केटमध्ये दिसत आहेत. लोकसभा मतदारसंघातील हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याची खबर सर्वत्र व्हायरल झाली आहे. याचं गांभीर्य नागरिकांनी आता तरी लक्षात घेऊन घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती करून नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्माणीवार, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, आरोग्य निरीक्षक चंद्रकांत दुधारे, अधिक्षक रमेश नेम्माणीवार, प्रकाश गुंटापेल्लीवार, लेखापाल बिराजदार, अझहर अली व इतर कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांनी बाजारात फिरून ही दुकाने सायंकाळी सहा नंतर पुर्णतः बंद ठेवण्याचे फर्मावले. अशाप्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेफुजूल फिरणारांना लगाम लावण्यास नगरपालिका प्रशासन पुढे सरसावले आहे.

No comments:

Post a Comment

Pages