डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती क्रांतीसूर्य समूहात ऑनलाइन साजरी
किनवट : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२९ वी जयंती क्रांतीसूर्य व्हाट्सअप समूहात ऑनलाइन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार यश भालेराव हे होते,तर उद्घाटक म्हणून रायगड येथील प्राध्यापक डॉ. बुद्धरत्न भवरे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेर येथील प्रसिद्ध गायक गौतम पाढेन यांनी अभिवादन गीत सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्तंभलेखक उत्तम कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी केले तर आभार सांगावकर महेंद्र नरवाडे यांनी मानले.
ऑनलाईन कार्यक्रमात किनवट येथील नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम,किनवट न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे (किनवट), भारतीय बौद्ध महासभेचे माधव सरपे (नांदेड), आंबेडकरी व्याख्याते प्राध्यापक डॉ. पंजाब शेरे (किनवट), बौद्ध साहित्याचे अभ्यासक शरद महाकष्यप (किनवट), साहित्यिक प्राध्यापक गजानन सोनोने (अमरावती), सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉ. उत्तम शेंडे (घाटंजी) भारतीय बौद्ध महासभेच्या उपासिका कुसुम भवरे (यवतमाळ) या मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमास रूपेश मुनेश्वर, भारतध्वज सर्पे, अशोक निमसरकर, अनिल गिमेकर, जयपाल भालेराव, अनिल भवरे, धनराज हलवले, राम ढाले, पंडित घुले, नितेश भवरे, दिलीप कावळे, राजकुमार खरतडे, दिलीप भगत, मोहन भवरे, शेषराव पाटील, अजय पाटील, सचिन गिमेकर, सोमा पाटील, प्रमोद तामगाडगे, अनिल उमरे, राजा तामगाडगे, सविना मुनेश्वर, करुणा पवार, प्रीती भवरे, यांच्यासह समूहातील सर्व सभासद ऑनलाईन उपस्थित होते.
Monday 20 April 2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती क्रांतीसूर्य समूहात ऑनलाइन साजरी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment