जंगलाचा विनाश वाचविण्यासाठी वन विकास महामंडळ बरखास्त करा ; प्रकाश गब्बा राठोड
किनवट : तालुक्यातील जंगलाचे वाळवंट होण्यास जबाबदार असलेले व वण्य प्राण्याच्या मृत्यु थांबवण्यात अपयशी ठरलेले वन विकास महामंडळ बखास्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी नुकतेच झालेल्या दोन व काही दिवसापुर्वी कमठाला शिवारातील दोन असे एकुण चार बिबट्यांच्या मृत्युच्या पार्श्वभुमीवर शासनाकडे केली आहे.
किनवट च्या राखिव जंगलाचे देखभाल करणे व वन्यजिवांचे संरक्षण व संवर्धन करणे ही जबाबदारी वन विभाग व वन विकास महामंडळाची आहे. परंतु, कुंपणच शेत खाते या म्हणीला सार्थक ठरवेल अशी कृती ही वन विकास महामंडळाच्या एकुण कारभारातून स्पष्ट निदर्शनास येते कारण किनवट तालुक्यातील जंगल हे होत्याचे नव्हते झाले आहे. आधी घनदाट असलेले जंगल आता विरळ झाले आहे कारण वन विकास महामंडळा कडुन विरळनीच्या नावाखाली चांगले सागवान या जातीच्या वृक्षाची बेसुमार कटाई सुरु आहे. यात वन विकास महामंडळाच्या कर्मचा-यांचे व लाकुड तस्करांचे साटेलोटे असल्याचे वन विकास महामंडळाच्या कारभातून स्पष्ट निदर्शास येत आहे, असा आरोप ही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी केला आहे.
कांहि वर्षा पुर्वी किनवट चे जंगल हे अख्या मराठवाड्याचे वैभव होते व जंगलांचा जिल्हा म्हणुन नांदेड या जिल्ह्याला फक्त किनवट मुळे ओळख मिळाली. परंतु, वन विभागाचे उंटावरुन शेळी हाकण्याच्या करभारामुळे जंगलांचा जिल्हा नांदेड हा मान लवकरच हिरावला जाणार आहे. कारण उपवन संरक्षक कार्यालय हे नांदेड येथे असल्याने व उपवन संरक्षक हे अती महत्वाचे पद नांदेड येथुन कारभार पाहत असल्याने जे किनवट व नांदेड दरम्यान १६० कि.मी चे अंतर आहे. यामुळे अनेक अडथळे निर्माण होत आहे तर उप वन संरक्षक हे कार्यालय किनवट येथे स्थांनातरीत करावे, ही किनवट भागातील वनप्रेमी नागरीकांची अनेक वर्षापासुन मागणी आहे.
नुकतेच किनवट तालुक्यातील झळकवाडी शिवारात दोन बिबट्यांचा मृत्यु व काहि दिवसापुर्वी कमठाला व सिरमिटी शिवारात देखिल अशा पध्दतीने बिबट्यांचा मृत्यु झाल्याने वन विकास महामंडळ व वन विभाग हे वन्यजिव संवर्धन का कार्यात सपशेल अपयशी ठरले आहे. नाबार्ड कडुन कोट्यावधी रुपये हे वण्यजिवांच्या संवर्धाकरीता प्राप्त झालेले असतांना त्या कोट्यावधी रुपयांची उपलब्धता शुन्य असुन कुंपन शेत खाते ही म्हण उपयुक्त ठरत आहे.
किनवट च्या जंगलात बांधकामा करीता व घराला लागणारे फर्निचर करीता सर्वोत्कृष्ठ असे सागवान जातीचे लाकुड मुबलक प्रमाणात आहे यामुळे या लाकडाची तस्करी सुध्दा मोठ्या प्रमाणात होते तर वन विकास महामंडळ व वन विभागा कडुन विरळीकरणाच्या नावाखाली म्हणजे विरळीकरण म्हणजे हवेने, उन्मळुन पडलेले, व कुजलेले झाड हे पाडुन त्याचे लाकुड वन विभागाच्या डेपोवर आणुन त्याचा दरमहा लिलाव केला जातो. त्याला विरळीकरण म्हणतात. परंतु, वन विकास महामंडळाच्या कर्मचा-यांना त्यांच्या पगारी याच लिलावातुन काढायच्या असतात. यामुळे ते सागवान जातीचे चांगल्या प्रतीचे लाकुड ही जंगलातुन आणतात व त्याचा लिलाव करतात. यामुळे जंगलाचे वाळवंटात रुपांतर होत आहे. याकडे वन विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांनी जातीने लक्ष द्यावे, अन्यथा वन विभाग विरुध्द दाद मागण्याकरीता तिव्र आंदोलन करुन संबधित मंत्री महोद्यांच्या दालनात हे प्रकरण नेण्यात येईल, असे ही राष्ट्रवादी कॉग्रस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी सांगितले आहे.
Monday 20 April 2020
जंगलाचा विनाश वाचविण्यासाठी वन विकास महामंडळ बरखास्त करा ; प्रकाश गब्बा राठोड
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment