मुंबईच्या ५३ पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 April 2020

मुंबईच्या ५३ पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग

मुंबईच्या ५३ पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग




मुंबईत ५३ पत्रकारांना करोनाची लागण
करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजतेय.पोलिस, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पत्रकारांनाही करोनाची लागण झाली आहे. मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये १६८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार १६८ पैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजतेय.मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकारांची करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages