प्रासंगिक : लॉकडाऊन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 20 April 2020

प्रासंगिक : लॉकडाऊन

      लॉकडाऊन
   


कोरोना विषाणू च्या प्रदुर्भावाने जगभर थैमान घातल्याने विविध देशात वेगळ्या पद्धतीने लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर भारतात ही याची अमलबजावणी करण्यात आली पण त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व लॉकडाऊन आहे पण याचा फायदा काहीव्यापारी चढ्यादराने किराणा माल, अंमली पदार्थ इ. बाबीचा यात मोठ्याप्रमाणावर सामान्यपणे रोजंदारी मजूर, कामगार रिक्षचालक, सामान्य नागरिक यांची यामध्ये पिळवणूक होत आहे यात ते सर्रास पणे विक्री करीत असून ते सामन्याची आर्थिक लूट करीत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा लॉकडाऊन चा उद्देश सफल होणार नाही कारण ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांचे हाल होत आहेत एकीकडे कामकाज बंद भाववाढ, सरकारची मदत प्रत्येका पर्यंत पोहचण्याची आशा संपुष्टात आली आहे. तीन महिने गॅस ( उज्ज्वला योजना ) मोफत ,राशन स्वस्त धान्य दुकानावरील व सरकार कडून मिळणारी आर्थिक मदत ही सामान्य जनतेपर्यंत अद्यापपर्यंत पोहचली नाही त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोना विषाणच्या प्रादुर्भावा पूर्वी ते भूकबळी होतील ?
     लॉकडाऊन असूनही दारू, गांजा, अंमली पदार्थ यांची सर्रास विक्री केली जात आहे ते कोणाच्या आशीर्वादाने ? ते प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे .जगभर आयात निर्यात बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होते आहे ,सरकारने जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, मेडिकल, दवाखाने, भाजीपाला ,फळे, पेट्रोलपंप इ. चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे पण काही टवाळखोर तरुण विनाकारण शहरात,  गावात फिरताना दिसून येत आहे यांचा बंदोबस्त करावा अन्यथा यांचा संपर्क एखाद्या करोना बाधित लोकाशी आला एकत्र शहरातील जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काही जण बाहेर गावाहून आल्यानंतर ते तपासणी न करता घरी राहत आहेत यामुळे तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे .
        लॉकडाऊन मध्ये अडकलेले नागरिक ,कामगार,  विद्यार्थी ,वाहनचालक , अनाथ लोक इ. ची पोटाची भूक भागवण्यासाठी समाजसेवी संस्था, वैयक्तिक मदत ,पक्ष ,संघटना ,मंदिर ट्रस्ट इ. मार्फत लोकांच्या खाण्याचा, राहण्याचा प्रश्न सोडवण्यात येत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील  सर्व " गुरुद्वारा " तर्फे  जवळपास चार लाख पेक्षा जास्त लोकांची भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. यांनी दिलेला ' माणुसकीचा हात '   येणाऱ्या काळात तो  आठवणीत असेल , जनसेवा करणाऱ्या मानवाने स्वतः च्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
     सर्व सामान्य पणे लोक पोलीस, डॉक्टर ,नर्स ,प्रशासनातील जबाबदार व्यक्ती  यांना लोक  " देवाचा " दर्जा देताना पाहण्यास मिळत आहे  तरी आपली सर्वांची जबाबदारी आपण पार पाडू , प्रशासनास मदत करू !

आपण आपल्या कुटुंबाचे रक्षक
घरी रहा सुरक्षित राहा
घरी राहून कोरोनाला हरवू

               धन्यवाद

            भिमराव बुक्तरे नांदेड.  888014384

No comments:

Post a Comment

Pages