करोना (कोविड-१९) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यां च्या खात्यावर त्वरित शिष्यवृत्ती जमा करा - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू ) ची मागणी
मुुंबई:
सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या शिष्यवृत्ती व वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती व देय भत्ते मिळणेबाबत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे मा.धनंजय मुंडे
मंत्री ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच आयुक्त,सा.न्याय-पुणे याना निवेदन .
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉक डाऊन च्यामुळे अनेक पालकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर व हाताबाहेर जात आहे. आपणास याबद्दल कल्पना असेलच .त्याच अनुषंगाने महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप त्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्या. त्याचबरोबर वसतिगृहातिल विद्यार्थ्यांना मिळणारे मासिक भत्ते तसेच स्टेशनरी/स्टायपेंड ची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी जेणेकरून गोरगरीब विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना खूप मोठा आधार होईल असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे सहसचिव-दादाराव पंजाबराव नांगरे यांनी मेल च्या माध्यमातून निवेदन सादर केले आहे .
Friday 17 April 2020
Home
महाराष्ट्र
करोना (कोविड-१९) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यां च्या खात्यावर त्वरित शिष्यवृत्ती जमा करा - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू ) ची मागणी
करोना (कोविड-१९) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यां च्या खात्यावर त्वरित शिष्यवृत्ती जमा करा - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू ) ची मागणी
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment