कोरोनाच्या लढाईसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकेने केले पोलिसांना मोफत मास्क वाटप
किनवट : कोरोनाच्या लढाईसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्यामल पांडूरंग पांडागळे यांनी स्वतः घरी तयार केलेले मास्क किनवट पोलिसांना वाटप करून कोरोना मुक्तीसाठी दिवस -रात्र झटणारांची काळजी घेणारेही कुणी समाजात आहेत हेच दाखवून दिलं आहे.
गोकुंदा येथील रहिवाशी तथा परिक्षेत्र उमरी ( बाजार ) च्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्यामल पांडूरंग पांडागळे ह्या कोरोना (कोव्हीड-19 ) प्रतिबंध उपाययोजनेच्या कर्तव्यावर आहेत. घरघर सर्वेक्षण, होमकोरोंटाईनचा शोध अशा मोहिमेत फिरत असतांना त्यांना सीमावर्ती नाक्यासह ठिकठिकाणी पोलिस बंधू-भगिणी चोख कर्तव्य बजावतांना आढळून आले. मेडीकल मध्ये मास्क उपलब्ध नसत्याने रुमाल, दस्ती बांधून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी चोवीस तास पहारा ते देताहेत हे त्यांनी पाहिलं. कोरोना मुक्तीसाठी आपण कोणत्याही स्वरूपाची मदत करू शकतो हे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केलेलं आवाहन त्यांच्या डोळ्यासमोर आलं.
तेव्हा त्यांनी पोलिसांच्या मदतीने एका कापड व्यापाऱ्यास दुकान उघडायला लावून तीन मीटर कापड खरेदी केले. त्यातून चारशे मास्क घरी शिवले. याकरिता त्यांचे पती
जयवंत पुंडलिक बेद्रे व विशाल विलास राठोड यांचे त्यांना सहकार्य मिळाले.
बुधवारी ( दि. १ ) सकाळी साडे अकरा वाजता पोलिस ठाणे किनवट येथे सर्व पोलिस, होमगार्डस् बंधू - भगिनिंना मास्क मोफत वाटप केले. यावेळी पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरिक्षक
विजय कांबळे, गणेश पवार, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, उत्तम कानिंदे, पत्रकार किशन भोयर, प्रमोद पहुरकर, जगदीश सामनपेल्लिवार, विजय जोशी, एम.एम. टेलर, प्रा. जयवंत चव्हाण, निवेदक कानिंदे उपस्थित होते. अशाच प्रकारे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातीत कर्मचारी, दुधवाले, किराणा दुकानदार , भाजीपाला विक्रेते यांना सुद्धा मोफत मास्क वाटप केले.
त्यांच्या अनोख्या कार्याबद्दल गटविकास अधिकारी सुभाष धनवे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Wednesday 1 April 2020
कोरोनाच्या लढाईसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकेने केले पोलिसांना मोफत मास्क वाटप
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment