खाजगी शाळांनी पालकांकडून लॉकडाउन संपेपर्यंत शिक्षण शुल्क आकारु नये - मासू ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 April 2020

खाजगी शाळांनी पालकांकडून लॉकडाउन संपेपर्यंत शिक्षण शुल्क आकारु नये - मासू ची मागणी

खाजगी शाळांनी पालकांकडून लॉकडाउन संपेपर्यंत शिक्षण शुल्क आकारु नये - मासू ची मागणीरायगड :-
जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळांनी पालकांकडून लॉकडाउन संपेपर्यंत शुल्क आकारु नये या बद्दल आदेश देण्याबाबत शिक्षण अधिकारी,रायगड जिल्हा परिषद , रायगड यांच्याकडे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) च्या वतीने इमेल पत्रा द्वारे विनंती केली आहे.
शिक्षणमंत्री मा. वर्षा ताई गायकवाड यांनी आदेश दिले आहेत की शाळांनी लॉकडाउन संपेपर्यंत पालकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये .
या अनुषंगाने शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी शाळांनी पालकांना फी अथवा शुल्कासाठी नोटीस किंवा मेल पाठवू नये , जेणेकरून पालकांना याचा मानसिक त्रास होईल अन्यथा आपल्या खाजगी शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल ही सूचना संबंधित सर्व खाजगी शाळांना देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या संघटनेच्या माध्यमातून मेलद्वारे रायगड शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे .
सदर विषयाची गंभीर दखल जर शिक्षण विभागाने घेतली नाही तर याची तक्रार शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड आणि ना.बच्चूभाऊ कडू यांच्याकडे करण्यात येईल असे मासुचे महासचिव सुनील शिरिषकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे .


No comments:

Post a Comment

Pages