कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वृत्तपत्र छपाई, विक्री करणाऱ्या एजंट, विक्रेता माध्यमांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत आदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 April 2020

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वृत्तपत्र छपाई, विक्री करणाऱ्या एजंट, विक्रेता माध्यमांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत आदेश

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वृत्तपत्र छपाई, विक्री करणाऱ्या एजंट, विक्रेता, माध्यमांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत आदेश


 नांदेड  : जिल्ह्यात वृत्तपत्र छपाई, विक्री करणारे एजंट, विक्रेता, इलेक्ट्रॉनिक मिडिया या माध्यमांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध करावयाच्या आवश्यक उपाय योजना / निर्देशाबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीया व माध्यमांनी कोव्हीड -9 प्रतिबंध होण्याकामी पुढील प्रमाणे उपाययोजना करण्याबाबत आदेशीत केले आहे.

वृत्तपत्रांचे वितरण करणारे एजंट, छपाई, विक्रेते व वाटप करणारे लाईने बॉय यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून वितरीत करण्यात आलेले विहित नमूद ओळखपत्र बाळगावेत तसेच वृत्तपत्र वितरण सकाळी 5 ते सकाळी 8 या कालावधीत करावे. स्टॉल लाऊन वृत्तपत्र विक्रीस प्रतिबंध राहील. वृत्तपत्र छपाई व वितरणांच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याबाबत सर्वांना सुचना दयाव्यात. कार्यालयामध्ये स्वच्छता ठेवावी व निर्जतुकीकरणाची फवारणी करावी. दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्यात यावे. वृत्तपत्र वितरण कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करुन दयावेत.

सदर आदेश पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील तसेच यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश व परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages