मद्य विक्रीचे दुकाने 14 एप्रिल पर्यंत बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 April 2020

मद्य विक्रीचे दुकाने 14 एप्रिल पर्यंत बंद

मद्य विक्रीचे दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद नांदेड : आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3), विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-2), पॉपी-2 अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ ताडी विक्री केंद्र (टिडी-1) अनुज्ञप्ती 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा कालावधीत वाढवून मंगळवार 14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.

या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages