समतानगर येथील मित्रमंडळा तर्फे घेण्यात आले. रक्त दान शिबीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 April 2020

समतानगर येथील मित्रमंडळा तर्फे घेण्यात आले. रक्त दान शिबीर

समतानगर येथील  मित्रमंडळा तर्फे घेण्यात आले.   रक्त दान शिबीर




  नांदेड : शहरातील समता नगर येथील मित्र मंडळा तर्फे कोरोना (कोविड19)च्या  आजारा विरुद्ध लढण्यासाठी  महामाया बौध्द विहार येथे रक्त दान शिबीरा चे आज आयोजन केले होते.
   या  शिबीरास यूवकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.महाराष्ट्र मध्ये फक्त ७ दिवसाचा रक्त साठा आहे.राज्यात कोरोना कोविड १९ हा फैलावत आसून  दिवसें दिवस संक्रमीत लोकाची संख्या वाढ आहे. आशा वेळेस संक्रमित लोकांच्या उपचारा साठी पांढ-या पेशी ची अधिक गरज आसते.
 हे गांभिर्य लक्षात घेऊन समतानगर मित्र मंडळा ने  अर्पण ब्लड बॅंक  यांना घेतलेले रक्त दान केले आहे.या रक्त दान शिबीरा चे आयोजन अनिल ऐडके,देवानंद मोगले,दुर्गेश साळवे,नितेश वाघमारे,हर्षद मोगले,राजपाल भालेराव,धम्मदीप गायकवाड,रोहित जमदाडे,कृष्णा वाघमारे,शिलानंद दवने,सुमीत एडके,अक्षय,किरण घोडजकर,विद्याधर हाणवते,अजय भालेराव यांनी या शिबीरा चे यशस्वी आयोजन केले. या शिबीरात डाँ हर्षवर्धन दवने ,आशोक वायवळे,राहुल एडके,प्रा.सुशील जोंधळे,शिवाजी भालेराव या युवा नेत्यांनी रक्त दान केले.अर्पण ब्लड बँकचे मदन कळसे,सीनीयर टेक्नीशीयन गंगाधर पवार,कोमल वाघमारे, विशाल वायवळे,स्मीता राठोड,शुभम गन्ने यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages