गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या ४३३वर पोहचली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 April 2020

गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या ४३३वर पोहचली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती.

गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या ४३३वर पोहचली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती.





मुंबई: महाराष्ट्रातील कोरनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला असून गुरूवारी राज्यात ८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२३ वर पोहोचली आहे.  राज्यात आज कोरोनाने ४ जणांचे बळी घेतले असून त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २० वर गेली आहे. आज, गुरूवारी आढळेल्या कोरोनाबाधितांपैकी ५४ रुग्ण मुंबईचे ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील असून ९ जण अहमदनगरचे तर ११ पुणे येथील आहेत.  औरंगाबादेतही नव्यान दोन रूग्ण आढळून आले आहेत. सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात ४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ३१ मार्च रोजी नायर रूग्णालयात दाखल झालेल्या एका ६१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. त्याला रक्ताचा कर्करोग होता. सायन रुग्णालयात २९ मार्चला भरती झालेल्या दुसऱ्या एका ५८ वर्षीय पुरूषाला मूत्रपिंडाच्या जुनाट आजाराबरोबरच उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. कस्तुरबा रूग्णालयातही एका ६३ वर्षीय तर २६ मार्चपासून एका खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या अन्य एता ५८ वर्षीय पुरूषाचा मृतात समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २० झाली आहे.

दरम्यान, राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३  नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार २४४  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages