नांदेड, दि. 30 :- कोरोना विषाणु संदर्भात आज गुरुवार 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नांदेड येथे 1 हजार 112 संशयितांची नोंद झाली आहे. वरील दोन्ही कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. त्यांचे 14 दिवसानंतर परत स्वँब तपासणीसाठी घेण्यात येतील.
त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 असून त्यापैकी 795 निगेटिव्ह आहेत तर 180 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच 1 निष्कर्ष निघालेला नाही. एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 व त्यापैकी 3 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत.
यापैकी नांदेड शहरात पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा (वय 64 वर्ष) पॉझीटिव्ह अहवाल हा 22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे 30 एप्रिल पर्यंत प्रकृती गंभीर होती. रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू आज 30 एप्रिल 2020 रोजी झाला असून या रुग्णाचा दफनविधी हा आसरानगर कबरस्तान येथे 5 माणसाच्या उपस्थितीत ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येणार आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले असून सर्व 80 व्यक्तींचे अहवाल पहिले निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आज 29 एप्रिल 2020 रोजी 51 निकटवर्तीय व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वँब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
नांदेड अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा दि. 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून सदर रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा दि. 30 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची गंभीर आहे.
वरील दोन्ही कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. त्यांचे 14 दिवसानंतर परत स्वँब तपासणीसाठी घेण्यात येतील. त्यामुळे अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
Thursday 30 April 2020
Home
Unlabelled
कोरोना बाधित दोन रुग्णांवर उपचार सुरु 14 दिवसानंतर त्यांचे परत स्वॅब तपासणीसाठी घेणार
कोरोना बाधित दोन रुग्णांवर उपचार सुरु 14 दिवसानंतर त्यांचे परत स्वॅब तपासणीसाठी घेणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment