किनवट : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अचानक पणे संचारबंदी लागल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना घरातील कापूस विक्री करण्यासाठी वेळच मिळाला नाही.लॉक डाऊन मध्ये खाजगी व्यापाऱ्यांनी देखील आपले बस्तान गुंडाळल्याने माहूर, किनवट तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी पाठपुरावा करून चिखली फाटा तालुका किनवट येथील सी.सी.आय.चे कापूस खरेदी केंद्र पूर्ववत चालू करण्याची मागणी रेटून लावल्याने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करून टप्प्याटप्प्याने कापूस खरेदी करण्याचे ठरले होते. परंतु, या कापूस खरेदी केंद्रावरील कार्यरत परराज्यातील प्रशिक्षित कामगार व टेक्निकल स्टाफ आपल्या मूळ गावी परतल्याने शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला कापूस घरी खितपत पडला आहे. अशा परिस्थितीत न खाजगी व्यापारी उपलब्ध आहे. ना हे कापूस खरेदी करण्यासाठी सरकार समर्थ आहे. अशा परिस्थितीत किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्री बाळासाहेब पाटील यांना लेखी पत्र देऊन किनवट आणि माहूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गूगल सीटवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने सीसीआय चे भाव व खाजगी व्यापार पेठेतील भाव यामधील तफावत रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणी दिनांक 29 एप्रिल रोजी एका पत्राद्वारे केली आहे. सध्या,एम.एस. कोटेस जिनिंग-प्रेसिंग चिखली फाटा तालुका किनवट येथे सीसीआय ची कापूस खरेदी होत नसल्याचे निमित्त साधून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांचा पांढरे सोने संबोधल्या जाणारा कापूस कवडीमोल भावात खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. लॉक डाऊन मुळे हाताला काम नाही. डोक्यावर कर्जाचे डोंगर अशात शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा बळी ठरलेला बळीराजाला या दुहेरी संकटातून वाचण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांना तातडीने तफावत अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहे.
Thursday 30 April 2020
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तफावत अनुदान द्या,आमदार केराम यांची मागणी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment