डॉ.हर्षदीप कांबळे यांच्याकडून नांदेड येथील गरीब गरजूंसाठी ३५० अन्नधान्य किट्सचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 30 April 2020

डॉ.हर्षदीप कांबळे यांच्याकडून नांदेड येथील गरीब गरजूंसाठी ३५० अन्नधान्य किट्सचे वाटप

नांदेड : वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे (IAS) यांच्या पुढाकारातून राज्यातील अनेक जिल्ह्यात गरीब कामगारांना गरजुंना अन्नधान्याचे किट्स वाटप करण्यात येत आहेत. काल डाॅ.कांबळे यांचा 'कोरोना आणि दान पारमितेची महाकरुणा'' यावर धम्मचक्र वेबसाईटवरील एक लेख व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांनी प्रतीत्यसमुत्पाद ह्या बुद्ध तत्वज्ञानानुसार सर्व जग एकमेकांवर अवलंबून आहे, असे सांगून हा काळ आपण एकमेकांना मदत करण्याचा आहे. तसेच मृत्यूनंतर आपण काहीच घेऊन जाणार नाही, त्यामुळे ह्या कठीण परिस्थितीत शक्य तेवढी जास्त मदत गरजूना, गरिबांना करावी, असे आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहनाला प्रेरित होऊन जयपाल गायकवाड यांनी काल डॉ.कांबळे यांना कॉल केला आणि नांदेड मध्ये सुद्धा काही गरजू लोकांना मदतीची गरज आहे. नांदेडसाठी काही अन्नधान्याचे कीट्सची मदत करावी, अशी विनंती केली. त्यांनी यावेळी जयपालला म्हटले की, तुम्ही काही रक्कम जमा करावी तुमच्याकडे जेवढी रक्कम जमेल तेवढ्या रक्कमेचे अन्नधान्य मी माझ्या मित्र परिवाराच्या मदतीने आपल्याला मदत मिळवून देणार असे सांगितले.

   जयपाल यांनी आज सकाळी काही मित्रांशी संवाद साधून नांदेड मध्ये मदत करायची आहे, असे सांगितले. दिवसभरात जवळपास ७५ हजार रुपये जमले.डाॅ.कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे काही रक्कम जमा झाल्यावर परत कॉल केला आणि ७५ हजार रुपये रक्कम जमा झाल्याचे सांगितले. डाॅ.कांबळे यांनी शाबासकी दिली आणि आपल्या  मित्र परिवाराच्या सहकार्याने माझ्याकडे जमलेल्या रक्कमे इतके अन्नधान्य उपलब्ध करून दिले. 'बोले तैसा चाले' याप्रमाणे डॉ.कांबळे जे बोलतात ते प्रत्यक्ष करून दाखवतात याची प्रचिती आज आली.

त्यासोबतच अन्नधान्याचे किट्स कसे असावे व त्याचे वाटप गरजूपर्यंत कश्या पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन डॉ.कांबळे  यांनी केले. योगायोग सिडको भागातील जयपाल गायकवाड यांचे मित्र प्रसेनजीत वाघमारे याने सिडकोतील एका भागात अन्नधान्याच्या किट्सची गरज असल्याचे सांगितले. आज तत्काळ जुना मोंढा भागातील होलसेल किराणा  दुकानात ४०० रुपये प्रति किट्स प्रमाणे एकूण ३५० अन्नधान्याचे कीट्सची ऑर्डर देण्यात आली. जे की आठवडाभर पुरेल. उद्या सायंकाळी हे सर्व फूड किट्स हातात पडणार आहेत.

डॉ.हर्षदीप कांबळे यांना केलेल्या एका फोन मुळे नांदेडमधील दुर्लक्षित असलेल्या जवळपास ३५० कुटुंबांची आठवड्याभराची का होईना अन्नधान्याची सोय झाली याचे समाधान वाटत आहे. ह्या कठीण परिस्थितीत शासकीय नियमावलीचे पालन करून फिजिकल डिस्टन्सही राखून हे कार्य करायचे आहे.

बुद्ध पौर्णिमा काही दिवसांवर आली आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर यावर्षी बुद्ध पौर्णिमा सर्वांना घरातच बसून साजरी करावयाची असल्याने डॉ.कांबळे सरांनी बुद्ध पौर्णिमेचे सर्व कार्यक्रम ऑनलाईन करण्याचे ठरविले आहे. याचे प्रेक्षपण फेसबुक लाईव्ह, आवाज इंडिया टीव्ही आणि धम्मचक्र वेबसाईटच्या माध्यमातून होणार आहे. तसेच ७ मे (गुरुवारी) बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यात गरीब कामगारांना, गरजुंना जवळपास २५ हजार अन्नधान्याचे कीट्सचे वाटप करण्यात येणार आहेत. इतकं मोठं कार्य फक्त आणि फक्त डॉ.कांबळे हेच करू शकतात..
  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक जाण असलेले अधिकारी/समाजसेवक हवे होते. यामध्ये डॉ.हर्षदीप कांबळे आज अग्रस्थानी आहेत.

No comments:

Post a Comment

Pages