विविध अत्यावश्यक सुविधांसाठी हेल्पलाईन व ऑनलाईन ई-पास
नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन अत्यावश्यक सेवा पास प्रणाली व ई-मेल आयडी कार्यान्वित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी पुरविण्यात आलेले हेल्पलाईनमध्ये किराणा, भाजीपाला, फळे, दूध, अंडी, औषधे, मेडिकल होम डिलिव्हरी वाहतूक तक्रारीसाठी 9975629251 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. वैद्यकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, सफाई कर्मचारी, वीज वितरण कर्मचारी व पाटबंधारे कर्मचारी आदी सेवा पुरवणाऱ्या तक्रारीसाठी 9975629279, शेतमजूर, शेतीचे संबंधित, साखर कारखाने कर्मचारी व सुपरवायझर, अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची आवश्यकता असणा-यासाठी 9975629837 तर औषधे बनवणारे, खाद्यपदार्थ बनवणारे, सुरक्षारक्षक, सुरक्षाव्यवस्था, इंटरनेट, केबल, टेलिफोन सेवा कंपनी विषयक तक्रारीसाठी 9975628969 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन अत्यावश्यक सेवेच्या तक्रारी करिता नांदेड पोलीस दलातर्फे coronahelplinenanded@gmail.com हा नव्याने मेल आयडी तयर करण्यात आला आहे. सदर ई-मेल आयडीवर येणाऱ्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्यासाठी संगणक कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील एक अधिकारी व दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नागरिकांच्या उपलब्धतेसाठी सुखकर सेवा उपलब्ध होण्याकरिता ई-पास प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली असून यामध्ये शहरातील सर्व नागरिकांना ई-पासद्वारे आपले ई-पासेसऑनलाईन मिळवता येतील. सदर पासेस हे नागरीकांनी https://covid19.mhpolice.in या लिंक वरून आपली मागणी नोंदवून आपणास ई-पास उपलब्ध झाल्यास त्याचा उपयोग करावा अशी विनंती पोलीस दलामार्फत करण्यात आली आहे.
Friday, 3 April 2020

विविध अत्यावश्यक सुविधांसाठी हेल्पलाईन व ऑनलाईन ई-पास
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment