जळालेल्या स्वप्नांना सम्यकचा आधार ; जीवनावश्यक वस्तुंचे केले वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 April 2020

जळालेल्या स्वप्नांना सम्यकचा आधार ; जीवनावश्यक वस्तुंचे केले वाटप

नाशिक मधील गंजमाळ भिमवाडी येथे दि.२५ एप्रिल २०२० रोजी झालेल्या अग्नितांडवात सुमारे १०४ कुटुंब पुर्णपणे उद्ध्वस्त झाले. एकीकडे कोरोनाचे संकट,राज्यातील लॉकडाऊन आणि त्यात ही जिवावर बेतणारी घटना...यामुळे त्या १०४ कुटुंबांचे जिवन विदारक बनले आहे. सरकारी यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा ह्या साऱ्यांना पीडित कुटुंबे अक्षरशः कंटाळले आहे.

अशातचं वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी या पीडितांना महत्त्वपूर्ण,गरजेच्या,आरोग्यदायी आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या वतीने २५ तारखेपासूनचं महाराष्ट्रातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातुन मदतीचे आवाहन केले होते. ह्या आवाहनाला जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. संघटनेकडे आज रोजी ६० हजार रु.मात्र रक्कम जमा आहे. यातूनचं महिलांसाठी सायनेटरी नॅपकिन,महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी अंतर्वस्त्र,अंघोळीची आणि कपड्यांची साबण,तेल इ.वस्तूंचे वाटप दि.२८ एप्रिल २०२० रोजी बी.डी.भालेकर प्राथमिक शाळा येथे करण्यात आले.

प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य सचिव संविधान गांगुर्डे,जिल्हाध्यक्ष संतोष भालेराव,मिहीर गजबे,दिपक पगारे,कोमल पगारे,चेतन जाधव,निखिल भुजबळ,प्रदिप पगारेअनिकेत शिराळ आणि वंचित बहुजन आघाडीचे जितेश शार्दूल,चेतन गांगुर्डे, स्वराज नंद,ऍड.विनय कटारे,बाबाजी केदारे आणि ताराचंद मोथमल इ.कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages