किनवट : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयात शंभर खाटांची मान्यता द्यावी अशी मागणी आ. केराम यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभुमिवर शासन स्तरावरून बचावासाठी युध्दपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. तथापि किनवट या आदिवासी बहूल भागातील गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयात आजमितीस केवळ ५० खाटांची उपलब्धता असल्याने पुरेश्या खाटांअभावी भविष्यात अडचण भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेवून या रूग्णालयात १०० खाटांची उपलब्धता करून सर्व सोयीयुक्त अद्यावतीकरण करावे अशी लेखी मागणी आ. केराम यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांचेकडे केली आहे.
No comments:
Post a Comment