किनवट :- बारा बलुतेदार कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी आ. केराम यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन, संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने हातावर पोट असणा-या बाराबलुतेदार मंडळींचा ( नाभिक, चर्मकार, सुतार, कुंभार, लोहार, परीट (धोबी) आदी) उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापी बाराबलुतेदार कामगारांतील नाभिक समाजाचा थेट सार्वजनीक जनतेच्या संपर्काशी निगडीत व्यवसाय असल्याने लॉकडाऊन काळापासून ग्रामीण व शहरी भागातील बाराबलुतेदार समाजासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला असून या कामगारांना शासकीय मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपातळीवरून तातडीने सर्व्हेक्षण करून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिवनावश्यक वस्तूंसोबतच आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची लेखी मागणी आ. केराम यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांचेकडे केली आहे.
No comments:
Post a Comment