किनवट,दि.२९ : सारखणी (ता.किनवट) येथील रहिवासी व शिक्षक शेख मन्नान अब्दुल करीम यांचे आज(ता.२९) सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या निवास्थानी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
ते उमरी(बा.)ता.किनवट)येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक या पदावर कार्यरत होते. अतिशय शिस्तप्रिय, शांत, स्वभावाचे असलेले व्यक्तीमत्व अशी त्यांची परिसरात ओळख होती.विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या पवित्र रमजान महिण्यातील त्यांचा उपास सुरु होता. काळाने त्यांच्यावर घाव घातल्याने त्यांच्या परिवारावर अतिशय दुःख ओढावले आहे.पत्रकार शेख मझर यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment