डॉ. डी. एम. खंदारे यांचा सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 April 2020

डॉ. डी. एम. खंदारे यांचा सत्कार

 नांदेड :  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे  प्रभारी वित्त व लेखाधिकारी म्हणून विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे माजी संचालक  प्रा. डॉ. डी. एम. खंदारे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा मंत्रालयीन मागासवर्गीय संघटना विद्यापीठ शाखेच्या वतीने चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. ए. टी. सूर्यवंशी (दादा) यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
   डॉ. खंदारे यांची या पदावर नियुक्ती केल्याबद्दल कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.  डॉ. ए. टी. दादांनी यावेळी डॉ. खंदारे सरांनी केलेल्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन डॉ. खंदारे सरांना पुढील कार्यासाठी, कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
     यावेळी डॉ. खंदारे सरांचे वडिलांचे निधन झाले असल्यामुळे उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास प्रा. डॉ. एस. जी. जाधव, प्रा. डॉ. प्रकाश वाघमारे, प्रा. डॉ. नितिन गायकवाड, प्रा. डॉ. राहुन सरोदे, नेते काळबाजी हनवते, संदिप जाधव, विजय आचलखांब, मिलिंद हाटकर, सचिन कुऱ्हे, सुनील रावळे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages