कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा - मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 April 2020

कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा - मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना

कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा - मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना




मुंबई, : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

No comments:

Post a Comment

Pages