लॉकडाऊनच्या काळात दि.3 मे पर्यंत रिपाइं तर्फे गरीब गरजूंना भोजनदान -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात दि. 3 मे पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या निवासस्थानी गरीब गरजूंना मोफत भोजन वाटप करण्यात येणार आहे. दि. 25 मार्च पासून ना रामदास आठवले यांच्या निवासस्थानी दररोज भोजन वाटप केले जात असून आज भोजन वाटपाच्या सलग 23 व्या दिवशी नेहमी प्रमाणे ना आठवले यांनी भोजन वाटपाची पाहणी केली. सोशल डिस्टन्स च्या नियमांचे पालन करून भोजन वाटप केले जात असून लॉक डाऊन कालावधी वाढल्यामुळे येत्या दि. 3 मे पर्यंत भोजन वाटप करण्यात येणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.
रिपाइं ( आठवले) पक्षाचे कार्यकर्ते देशभरात विविध ठिकाणी गरीब गरजूंना भोजनदान; रेशन वाटप करीत आहेत. पोलीस; आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगारांना काही ठिकाणी हळदीयुक्त दूध: मिनरल वॉटर ; भोजन आदी वाटप केले जात आहे. दिल्लीत आठवले अन्नपूर्णा रसोई तर्फे 500 गरीब गरजूंना दररोज भोजनदान करण्यात येत आहे. डोंबिवली मध्ये आरपीआय चे अंकुश गायकवाड यांच्या तर्फे गरजूंना 5 हजार किलो तांदूळ धान्यवाटप करण्यात आले. आरपीआयच्या शीतल साळवी यांनी पोलिसांना हळदी युक्त दूध वाटप केले. दहिसर येथे आरपीआय चे रमेश गायकवाड गरीब गरजूंना धान्य वाटप करीत आहेत. आदी अनेक ठिकाणी रिपाइं कार्यकर्ते लॉकडाऊणच्या काळात गरीब गरजूंना मदत करीत आहेत.
Friday, 17 April 2020

Home
महाराष्ट्र
लॉकडाऊनच्या काळात दि.3 मे पर्यंत रिपाइं तर्फे गरीब गरजूंना भोजनदान -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
लॉकडाऊनच्या काळात दि.3 मे पर्यंत रिपाइं तर्फे गरीब गरजूंना भोजनदान -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment