वन विभागाच्या पथकाने तस्करी होणारे सागवानी लाकडे केले जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 April 2020

वन विभागाच्या पथकाने तस्करी होणारे सागवानी लाकडे केले जप्त

वन विभागाच्या पथकाने तस्करी होणारे सागवानी लाकडे  केले जप्त






किनवट : वन विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता
दि.१६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका कार्यवाहीत  किनवट अंतर्गत  नियतक्षेत्र - पिंपळगाव मधील बेल्लोरी - पिंपळगाव रोडवर अवैध पाच सागी  कट साईज नग वाहतूक करीत असतांना जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेला माल घ.मी.मध्ये ०.२१९१ एवढा आहे. ज्याची बाजारभावाने किंमत १३ हजार ६४७ रुपये एवढी आहे.
   सदर कार्यवाही आशिष ठाकरे, उपवनसंवरक्षक, नांदेड,श्री. गायकवाड, सहाय्यक वनसंवरक्षक किनवट  यांच्या मार्गदर्शनाखाली
वनपरिक्षेञ अधिकारी श्री. खंदारे, वनरक्षक संभाजी घोरबांड,अरुण चुकलवार ,साईदास पवार, रवी दांडेगावकर, मुळे,शिंपाळे  पाटील (एफडीसीएम), काळेवाड (एफडीसीएम), सूर्यवंशी, अमोल शिर्षे, पेदे,  वाहन चालक बी. व्ही आवळे, बी. टी.भुतनर, मोरे (एफडीसीएम), दांडेगावकर   यांच्या पथकाने पार पाडली.

No comments:

Post a Comment

Pages