भारतीय संविधानातली ताकत आज अमेरीकेतही नाही
-संजय आवटे
-----------------------------
भारताचे PM मोदी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करू शकतात. अमेरिकेत ट्रम्प मात्र ते करत नाहीत.
भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे. ३२ कोटींच्या अमेरिकेत २,४०,००० रुग्ण आहेत. ६,००० मृत्यू झाले आहेत. एका दिवसात १,००० लोक कोरोनामुळे गेले.
तो देश भयभीत झाला आहे.
तरीही ट्रम्प तिथे लॉकडाऊन जाहीर करत नाहीत.
मोदी मात्र लॉकडाऊन जाहीर करतात आणि अवघ्या देशात काही तासात शुकशुकाट होतो.
जगाला आश्चर्य वाटत राहाते.
यात मोदी वा ट्रम्प हा मुद्दा नाही.
मुद्दा आहे तो, डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी लीहीलेल्या संविधानाचा.
हे मी म्हणत नाही.
अमेरिकेतील थोर संपादक, अभ्यासक फरीद झकारिया म्हणताहेत.
"Modi could impose lockdown, Trump doesn't have that power."
अशी मांडणी करत फरीद म्हणतात,
'भारताच्या राज्यघटनेत केंद्राकडे ती शक्ती आहे. जी अमेरिकेत नाही.'
भारतात 'फेडरल' व्यवस्था असली, तरी भारत हे 'युनियन' आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष अशा वेळी उपस्थितही होत नाही.
अमेरिकेत ५० राज्ये आहेत. देशासोबत प्रत्येक राज्याचे नागरिकत्व वेगळे. राज्ये त्या अर्थाने स्वायत्त आहेत. त्यामुळे अध्यक्षांना, राज्यांना डावलून, या स्वरूपाचे निर्णय घेता येत नाहीत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेतूतः 'युनियन', 'संघराज्य' हा शब्द राज्यघटनेत वापरला.
अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स. तिथे राज्ये एकत्र येऊन देश स्थापन झाला.
भारतात, आधी देश आकाराला आला आणि मग प्रांतरचना झाली. नेशन फर्स्ट!
म्हणून, ही शक्ती मोदींना मिळते.
किती लहानसहान गोष्टींचा विचार केला होता आपल्या डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी! म्हणून, भारत अतुट आणि महान आहे.
जे तुम्हाला विचारतात ना, "आम्ही 'संघ' स्थापन केला. तुम्ही काय केलं? त्यांना सांगा, 'आम्ही संघराज्य स्थापन केलं.'
५ एप्रिलला दिवा लावलात.
आता १४ एप्रिलपर्यंत तरी
डोक्यात प्रकाश पडू द्या!
भारतीय संविधान झिंदाबाद!
- संजय आवटे
No comments:
Post a Comment