नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व्यक्तींना
स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध ; शिवभोजन थाळीचा 64 हजार 194 गरीबाला लाभ
नांदेड, दि. 15 :- नांदेड जिल्हयात 22 शिवभोजन केंद्र कार्यान्वित असून जिल्हयात दररोज 2 हजार 500 थाळींचा इष्टांक पूर्ण होत आहे. रविवार 12 एप्रिल पर्यत 64 हजार 194 शिवभोजन थाळीचा लाभ जिल्हयातील गरीब व गरजू व्यक्तींनी घेतला आहे. शिवभोजनाची प्रती थाळीसाठी लाभाधारकाकडून 30 मार्च पासून पुढील तीन महिण्यापर्यत पाच रुपये इतकी आकारणी करण्यात येत आहे.
अन्न नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय 1 जानेवारी 2020 नुसार नांदेड जिल्हयास 500 थाळी इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार नांदेड जिल्हयात समितीने महानगरपालीका, जिल्हास्तरावर नांदेड शहरामध्ये एकूण 4 शिवभोजन केंद्राची प्रत्येकी 125 थाळीप्रमाणे निवड करण्यात आली. या शिवभोजन केंद्राव्दारे जिल्हयात गरीब व गरजू व्यक्तींना 26 जानेवारी पासून आतापर्यत स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन दिले जात आहे.
अन्न नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2020 नुसार नांदेड जिल्हयास दिलेला शिवभोजन थाळीचा इष्टांक व गरज पाहून मुळ इष्टांकात नवीन वाढीव इष्टांक दुप्पटीने मंजूर करण्यात आले. त्यानुसार जिल्हयात समितीने महानगरपालीका, जिल्हास्तरावर नांदेड शहरामध्ये नवीन 3 शिवभोजन केंद्रास प्रत्येकी 100 थाळी प्रमाणे निवड करण्यात आली. तसेच यापुर्वी दिलेल्या 4 शिवभोजन केंद्रास प्रत्येकी 50 नवीन थाळी वाढ करून एकूण प्रत्येकी 175 थाळीची संख्या निश्चीत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे शिवभोजन थाळींचे वाटप चालू आहे.
तसेच कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे स्थतलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्यावरील बेघर इत्यादी लोकांचे संपुर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने जेवण अभावी हाल अपेष्टा होऊ नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने शासन परिपत्रक 26 व 28 मार्च 2020 नुसार या योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्यास मंजुरी दिली आहे. नांदेड जिल्हयास मुळ थाळीच्या इष्टांकात पाचपट वाढ करण्यात आली असून त्यानुसार नांदेड जिल्हयातील 15 तालुक्यास प्रत्येकी 100 थाळीप्रमाणे इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व तालुक्यास प्रत्येकी एक याप्रमाणे 15 शिवभोजन केंद्राची तालुकास्तरीय समितीने निवड केलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषीत झाले असल्याने त्यानुसार गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध व्हावे याअनुषंगाने शिवभोजनालयास पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.
शिवभोजन उपलब्ध करुन देणारी भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत याकालावधीत गरीब व गरजू व्यतक्तींना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु राहतील. भोजनालय चालकांनी प्रत्येक ग्राहकाकडे कमीतकमी तीन फुट (एक मिटर) अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
शिवभोजनालय चालकांनी शिवभोजन उपलब्ध करुन देताना ग्राहकांना हात धुण्यासाठी साबन उपलब्ध करुन दयावे. शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत. भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जतुंक करुन घेणे. भोजनाची सर्व भांडी निर्जतुंक करुन घ्यावीत. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टीत स्वरुपात भोजन (packed food) उपलब्ध करुन दयावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले.
Wednesday 15 April 2020
Home
जिल्हा
नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध ; शिवभोजन थाळीचा 64 हजार 194 गरीबाला लाभ
नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध ; शिवभोजन थाळीचा 64 हजार 194 गरीबाला लाभ
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment